भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल वर्तलें नवल वर्तलें नवल गुरुचे पायीं

naval vartalen naval vartalen naval guruche payin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नवल वर्तलें नवल वर्तलें नवल गुरुचे पायीं । कापुर जळूनि गेला तेथें काजळीं उरली नाहीं ॥१॥ साखर पेरुनी ऊंस काढिला कान झाला डोळा । निबर बायको भ्रतार तान्हा सासरा तो भोळा ॥२॥ नवल वर्तलें नवल वर्तलें नवल चोजवेना । डोहामाजी मासोळीनें वांचविलें जीवना ॥३॥ नवल वर्तलें नवल वर्तलें अनाम चक्रपाणी । गोकुळ चोरुन नेलें तेथें कैंची दासी जनी ॥४॥