भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवाचिया माझारी आऊटपीठाशेजारी

navachiya majhari autapithashejari

नवाचिया माझारी आऊटपीठाशेजारी । शून्याची ओवरी सुनिळ प्रभा ॥१॥ जीवदशामय अंगुष्ठ प्रमाण । तयावरी अज्ञान प्रवर्तते ॥२॥ चैतन्याची मुस त्यामाजी ओतली । अव्यक्त देखिली वस्तु तेथें ॥३॥ व तें मसुरे प्रमाण तया नांव महाकारण । गुरूमुखे खूण जाण बापा ॥४॥ ज्ञानदेव म्हण यापरतें जाण । नाहीं नाहीं आण निवृत्तीची ॥५॥