भजनी मालिका
← भजनांकडे परत

नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठीं

nase to brahmandi nase to vaikunthin

नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठीं । दुजियाची गोष्टी नाहीं तेथें ॥१॥ तें रूप सुंदर देवकी उदरीं । वसुदेव घरीं कृष्ण माझा ॥२॥ ब्रह्मांडकडवा मनाचा वोणवा । साधितां राणिवा हारपती ॥३॥ निवृत्ति सुंदर कृष्णरूप सेवी । गयनीगोसावी उपदेशिलें ॥४॥