भजनी मालिका
← भजनांकडे परत

नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची

nara vitha gonda mahada pathavila | jhadavili jaga samadhichi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची ॥१॥ हरिदिनीं जागर केला निशीदिनीं । उदईक पारणीं द्वादशींची ॥२॥ गंगा गिरजा राही रुक्माबाई भामा । उठिल्या रांधण्या पारण्याच्या ॥३॥ नाना प्रकारचे पाक ते अपार । मुनि ऋषीश्वर बोलाविले ॥४॥ वैष्णव देव आणि आले सुरगण । करोनियां स्नान इंद्रायणी ॥५॥ पिंपळाचे पारीं बैसविल्या पंक्ती । पात्रें ते श्रीपती वाढूं लागे ॥६॥ नामा म्हणे देवा करणें साहित्यासी । येतो कासाविसी प्राण माझा ॥७॥