भजनी मालिका
← भजनांकडे परत

नंदें सोडविलें तेव्हां त्या कृष्णासी । नासूं देगे याशी दहीं दूध

nanden sodavilen tevhan tya krushnasi | nasun dege yashi dahin dudh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नंदें सोडविलें तेव्हां त्या कृष्णासी । नासूं देगे याशी दहीं दूध ॥१॥ मजला लेंकरें नाहींत गे फार । विश्रांतीसी घर एवढें आहे ॥२॥ निवारिलें विघ्न देवें हें केवढें । पडती जरी झाडें याजवरी ॥३॥ आजपासूनि यासी बोलसी कठीण । देईंन मी प्राण तुजवरी ॥४॥ स्फुंदस्फुंद रडे तेव्हां नारायण । देईं यासी स्तन भुकेलासे ॥५॥ यशोदा बाहात नये वनमाळी । धांवोनि कुरवाळी वदन त्याचें ॥६॥ समजावोनि देवा पाजितसे स्तन । घालीत भोजन नामा ह्मणे ॥७॥