भजनी मालिका
← भजनांकडे परत

नंदाचिये घरीं चंपाषष्ठी नेम । कुळीं कुळधर्म मार्तं-डाचा

nandachiye gharin champashashthi nem | kulin kuladharma martan-dacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नंदाचिये घरीं चंपाषष्ठी नेम । कुळीं कुळधर्म मार्तं-डाचा ॥१॥ पक्कानेंही नाना रोटिया भरीत । केलीं अपरमित यशोदेनें ॥२॥ वाघियामुरळी सांगितलीं दोन्हीं । आला चक्रपाणी खेळतांची ॥३॥ मातेलागीं म्हणे लागलीसे क्षुधा । थांबरे गोविंदा ह्मणे माता ॥४॥ घेतलीसे आळी करी लगबग । विस्तारिलें सांग नैवेद्यासी ॥५॥ नेवोनियां पुढें देवांच्या ठेवीले । बोलवा वहीलें आमंत्रिकां ॥६॥ तोंवरी मागे तो भक्षी नारायणा । यशोदा आपण रागावली ॥७॥ दुरळ हा देव होय आतां कैसें । मार्तंडाचें पिसें लागे तुज ॥८॥ करी क्षणामाजी वांकडेंचि मुख । हरी खात वीख कालवलें ॥९॥ जाणीतला भाव मायेचें अंतर । करूनियां खरें दावी देव ॥१०॥ वांकडिया हातें ग्रास वाली मुखें । मुख तेंहि सुखें तैसें दावी ॥११॥ पिसाळल्यापरी करी वेडेचार । भय वाटे फार माये-लागीं ॥१२॥ पूर्वीं म्यां सांगतां नायकसी कैसा । पुढें हा वोळसा वोढावला ॥१३॥ पाचारिले देवऋषि हालविती सुपें । त्याचिया न भियें देव निघे ॥१४॥ वासोनियां डोळे तयाकडे पाहे । कांपे तया भयें थरथरां ॥१५॥ मंत्रूनियां पाणी आणिला अंगारा । तयाचा मातेरा केला देवें ॥१६॥ नवसा न पावती गोकुळींच्या देवता । उपाय मागुता राहिलासे ॥१७॥ चिंतावली माय मूर्च्छ आली तीसी । झाली पोरपिसी मोहजाळें ॥१८॥ जाणोनी अंतर ह्मणे कृष्णार्पण । तेव्हां आलें विघ्न दूर होय ॥१९॥ नाना ह्मणे देव पाहे कृपादृष्टी । जाणवलें पोटीं हाचि देव ॥२०॥