भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामामृत सरिता चरणामृत माता । पवित्र हरिकथा मुगुट आणि

namamrut sarita charanamrut mata | pavitra harikatha mugut ani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामामृत सरिता चरणामृत माता । पवित्र हरिकथा मुगुट आणि ॥१॥ तेथें माझें मन होकां क्षेत्रवासी । राहेम संतांपाशीं सुख घेतां ॥२॥ अहिक्य परत्रें समतीरें साजि रीं । परमानंद लहरी हेलावत ॥३॥ मुक्तीची माउली मोक्षाची गाउली । शीणलिया सा-उली विषयताप ॥४॥ तेथें सनकादिक प्रेमळ सकळ । राहिले नि-श्चळ करोनि चित्त ॥५॥ नामा ह्मणे माझे सखे हरीजन । तारूं त्याचे चरण दृढ धरा ॥६॥