भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामामृत गोडी आहे वैष्णवासी । येरां प्राकृतासी कळेनाची

namamrut godi ahe vaishnavasi | yeran prakrutasi kalenachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामामृत गोडी आहे वैष्णवासी । येरां प्राकृतासी कळेनाची ॥१॥ प्राकृत हे जन भुलले विषयीं । नामाचिया गांवी कैसे जाती ॥२॥ नामीं चित्त व्हावेम जावें तेव्हां गांवा । मग नाम गोवा तेथें कैंचा ॥३॥ नाम तेंचि जाहालें वर्नरुपातीत । अनाम स्वतंत्र स्वयंभ तो ॥४॥ नामदेव म्हणे नाम हें सुलभ । अभक्ता दुर्लभ नानापरी ॥५॥