भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामदेवा घरी पाहुणे मेहुणे आले दोघेजण पंढरिसी

namadeva ghari pahune mehune ale doghejan pandharisi

रचनाकार: संत राजाई · अभंग
नामदेवा घरी पाहुणे मेहुणे आले दोघेजण पंढरिसी ।।१।। राजा बंधु देखुनि दृष्टिसी उल्हास मानसी थोर जाला ॥२॥ कडकडूनि भेटि लोभाची आवडी टाकली घोंगडी वैसावया ॥३॥ प्रतार लागले विठोबाचे ध्यानीं संसाराची मनीं आस्था नाहीं ||४|| नाचतो निर्लज्ज होऊनि निःशंक सांडिला लौकिक देहभाव ॥५॥ ऐसें जंव सांगे राजाई बंधुसी। तंव आले घरासी नामदेव ।।६।। तयासी सोयरे अभ्युत्थान देती । न भेटे तयासी विष्णुदास।।७।। देखुनी कांतेसी क्रोध आला फार असोनि संसार नाहीं आम्हां ||८|| अगडधूत येती घेऊनि टाळविणा । लागे त्यांचे चरणा वेळोवेळां ।।९।। जन्मामध्ये आले माझे सहोदर न बोले उत्तर त्यांसी कांहीं ।। १० ।। भोंदु घरी येती हरिनामें गर्जती । धुवुनि त्यांचें पिती पायावणी ।।११।। माझे सखे बंधु घरा आले बाई रामराम तोहि न घे त्यांचा ॥ १२ ॥ नामा म्हणे कांते राम हृदयांत सांठवुनी तृप्त जालों आम्ही ॥१३॥