भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचें सामर्थ्य नेणें वेदशास्त्र । शेषाचीं वक्त्रें मौनावलीं

namachen samarthya nenen vedashastra | sheshachin vaktren maunavalin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामाचें सामर्थ्य नेणें वेदशास्त्र । शेषाचीं वक्त्रें मौनावलीं ॥१॥ गंगा गणपति चंद्र सूर्य श्रेष्ठ । शंकर वरिष्ठ मौनावले ॥२॥ भीष्म पराशर उद्धव अंगद । ब्रह्मा मुचकुंद मौनावले ॥३॥ नामा म्हणे येरे जाणे स्तुति । दाटोनि श्रीपती उभा केला ॥४॥