भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचा धारक विष्णुरुप देख । वैकुंठीचें सुख रुळे पायीं

namacha dharak vishnurup dekh | vaikunthichen sukh rule payin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामाचा धारक विष्णुरुप देख । वैकुंठीचें सुख रुळे पायीं ॥१॥ निराकार देव आकारासी आला । भक्तीं पैं स्थापिला नामरुपा ॥२॥ नाममंत्र बीज जोंवरी नाहीं जया । तोंवरी केशवदया नाहीं प्राप्त ॥३॥ नामा म्हणे नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ हरीभक्त ॥४॥