भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा येऊनियां पाहे । आजि कौतुक दिसताहे

nama yeuniyan pahe | aji kautuk disatahe

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नामा येऊनियां पाहे । आजि कौतुक दिसताहे ।।१।। व्रत निवेदी राजाई लागे नामयाचे पायीं ॥२॥ नामा म्हणे या द्रव्यासी आम्ही नातळों मानसीं ॥ ३॥ वेगीं बोलवा ब्राह्मण करूं आतां संतार्पण ॥४॥ हातीं टाळ दिंडीगान। हेंचि आमुचें सर्व धन ||५|| ऐसें आश्चर्य देखोनी। जनी हांसतसे मनी ।।६।।