भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा हें वदतां डोळयां आलें पाणी । पडिला धरणीं देवापुढें

nama hen vadatan dolayan alen pani | padila dharanin devapudhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामा हें वदतां डोळयां आलें पाणी । पडिला धरणीं देवापुढें ॥१॥ नामदेव स्थिती पाहून श्रीपती । विस्मित ते चित्तीं स्तब्ध जाले ॥२॥ कैशा रीती नाम्य संबोखूं मी आतां । कठिण अवस्था देव म्हणे ॥३॥ प्रेम उचंबळे ऐकतां ही आळ । बुझावी गोपाळ नाम्यालागीं ॥४॥