भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम विठोबाचें थोर । तरला कोळी आणि कुंभार

nam vithobachen thor | tarala koli ani kumbhar

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नाम विठोबाचें थोर । तरला कोळी आणि कुंभार ॥ १ ॥ ऐसी नामाची आवडी । तुटे संसाराची बेडी ॥२॥ नाम गाय वेळोवेळां । दासी जनीसी नित्य चाळा ॥३॥