भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम विठोबाचें ध्यावें । मग पाउल टाकावें

nam vithobachen dhyaven | mag paul takaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम विठोबाचें ध्यावें । मग पाउल टाकावें ॥१॥ नाम तारक हें थोर । नामें तारिले अपार ॥२॥ आजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥ नाम दळणीं कांडणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥