भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम विठोबाचे घ्यावें। मग पाऊल टाकायें

nam vithobache ghyaven| mag paul takayen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नाम विठोबाचे घ्यावें। मग पाऊल टाकायें॥१॥ नाम तारक हैं थोर नामें तरिले अपार ॥२॥ आजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥ नाम दळणीं कांडणी म्हणे नामयाची जनी ॥४॥