भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी

nam sankirtan vaishnavanchi jodi

नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोडी गेलीं त्याचीं ॥१॥ अनंत जन्माचें तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठें ॥३॥ ज्ञानदेवीं यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥