भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम फुकाचें चोखट । नाम घेतां नलगे कष्ट

nam phukachen chokhat | nam ghetan nalage kashta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम फुकाचें चोखट । नाम घेतां नलगे कष्ट ॥१॥ पडशील ज्या सागरीं । रामनामें आत्मा तारी ॥२॥ पुत्रभावें स्मरण केलें । तया वैकुंठासी नेलें ॥३॥ नामा हें महिमान जाण । घेतो विठ्ठलाची आण ॥४॥