भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम न म्हणे आवडी । व्यर्थ वाचे बडबडी

nam na mhane avadi | vyartha vache badabadi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम न म्हणे आवडी । व्यर्थ वाचे बडबडी ॥१॥ जिव्हा नव्हे ती वाचक । भोगी आळसें नरक ॥२॥ करी आरालिया निंदा । परी न म्हणे गोविंदा ॥३॥ असत्या आवडी । सदा वाचेसी रोकडी ॥४॥ निंदेवांचूनि पातक । सत्या जाणा माझी भाक ॥५॥ गर्जे नामाचे पवाडे । पायां कळिकाळ पडे ॥६॥ निज सहज चैतन्य । नामा म्हणे नां जाण ॥७॥