भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम हें अमृत भक्तासी दिधलें । ठेवणें ठेविलें होतें गुप्त

nam hen amrut bhaktasi didhalen | thevanen thevilen hoten gupta

रचनाकार: संत सेना · अभंग
नाम हें अमृत भक्तासी दिधलें । ठेवणें ठेविलें होतें गुप्त ॥१॥ प्रत्यक्ष अवतार धरिला अलंकापुरी। मार्ग तो निर्धारी दाखविला ॥२॥ कृतयुगामाजी वरिष्ठ जाणता। नाम तो घेतां नारद मुनि ॥३॥ कलियुगामाजी न घडे साधन। जातील बुडोन महा डोहीं ॥४॥ रामकृष्ण हरी गोविंद गोपाळ। स्मरा वेळोवेळां सेना म्हणे ॥५॥