भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम हं अमृत भक्तांसी लाधलें । आपण घेतलें बौध्यरुप

nam han amrut bhaktansi ladhalen | apan ghetalen baudhyarup

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम हं अमृत भक्तांसी लाधलें । आपण घेतलें बौध्यरुप ॥१॥ नाम हें आळवा नाम हें आळवा । होईल दोहावा कामधेनु ॥२॥ न बाधेल विघ्न प्रपंच हें भान । नाम हेंचि खूण वैकुंठींची ॥३॥ नामा म्हणे जीव ब्रह्म असे सर्व । हा गीतेमाजीं भाव सांगितला ॥४॥