भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं हा आकार नाहीं हा विकार

nahin ha akar nahin ha vikar

नाहीं हा आकार नाहीं हा विकार । चतुर्भुज कर हरि माझा ॥१॥ हरिरूप पै जप हरिहररूप । गौळियांचें रूप सहज कृष्ण ॥२॥ हरिरूप घरीं सोळासहस्त्र नारी । तो बाळ ब्रह्माचारी गाई राखे ॥३॥ निवृत्ति रोकडे ब्रह्म माजिवडें । तो यशोदे पुढें लोणी मागे ॥४॥