भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाद रसी लीन ब्रह्म सामावले

nad rasi lin brahma samavale

रचनाकार: संत सोपान · अभंग
नाद रसी लीन ब्रह्म सामावले । त्यामाजि सानुले ब्रह्म चोख ।।१।। मन हे निकट ब्रह्मारूपे चोख । ब्रह्मी ब्रह्म लेख एकपणे ॥२॥ साशकित गावी जाला परिमाण । घट मटा दिन हारपला ॥३॥ सोपान सोपारे निरालंब निर्धरि । नंदाचे गोजिरे माजि खेळे ॥४॥