भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाचताम उडतां रडताम पडतां । नाम्या अवचितां हातां आला

nachatam udatan radatam padatan | namya avachitan hatan ala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाचताम उडतां रडताम पडतां । नाम्या अवचितां हातां आला ॥१॥ येतां जातां हरि हरि हरि वाटे । नाम तें चोखटें स्मरा मुखीं ॥२॥ हंसतां खेळताम घरीं दारीं पारीं । मुखीं हरि हरि म्हणे कां रे ॥३॥ खाताम जेवितां अन्नतृप्ति सारी । सांडी मांडी हरी सर्व काळ ॥४॥ नामा म्हणे नामीं आस्ति नास्ति ठसा । केशव हरि सन्मुख तुम्हां दिसे ॥५॥