भजनी मालिका
← भजनांकडे परत

नभ नभाचेनि सळें । क्षोभु वाहिजे काळिंदी जळें । सासिंनले जगाचे डोळे । तें रुप पाहावया

nabh nabhacheni salen | kshobhu vahije kalindi jalen | sasinnale jagache dole | ten rup pahavaya

नभ नभाचेनि सळें । क्षोभु वाहिजे काळिंदी जळें । सासिंनले जगाचे डोळे । तें रुप पाहावया । भलतैसी हांव । मना न पुरे तेथींची धांव । लावण्यसिंधु सिंव सांडूनि जातो गे माये ॥१॥ सुलभ परमात्मा गे माये । मन मुरोनि देखणेपणा उरी । याचि कारणें उभा भिवरेतीरीं । अनुपम्य जयाची थोरी गे माये ॥ध्रु०॥ काळिंदीजळाचा भोंवरा । कीं माजी वेढूनि इंदीवरा । माळ बांधोनियां मधुकरा । रोमांमाजी ॥२॥ सकल सिध्दिंचा मेळां । तेंवि विभूति शोभे भाळा । मुगुटीं रत्नकिळा । लिंग अनुपम्य गे माये ॥३॥ क्षीरसागरींचें । निवांत सुख । असो हें निमासुरें मुख । श्रीयेचें मनोहर देख । टवकारलें दोंभागीं ॥ पहावया ऊरंचीं शोभा । सकळ देवाची प्रभा । तेथें तारांगणें कैंचीं नभा । लेइला गे माये ॥४॥ कटावरी ठेवूनि हात । जनां दावी संकेत । भवजलाब्धीचा अंत । इतुलाची ॥ सम चरणींच्या खुणा । उभा पंढरीचा राणा । तो आवडे जनांमना । दुर्लभ गे माये ॥५॥ कैवल्याचा गाभा । कीं ब्रह्मविद्येचा वालभा । निकटपणाचिया लोभा । कैसा उभा असे ॥ देवा पायींची वीट । तेचि माये नीट । वरि येऊनि भीमातटी । वोळग दावी गे माये ॥६॥ नेति नेतिचेनि बिरारें । उभऊनि श्रीकरारें । श्रुंगाराचेनि पडिभरें । चराचरें वोळगती ॥ हा मेखळेचा मध्यमणी । उदो केला ग्रहगणीं । मध्य नायकु तरणी किरणीं । विरजितु गे माये ॥७॥ आमुची ह्रदयींची श्रीमूर्ति । घेऊनि विठ्ठलवेषाची बुंथी । आतां चाळविसी किती । बापा पालटु नेघे ॥ बाप रखुमादेविवरा विठ्ठला । त्वां मजशीं अबोला कां धरिला । जीवीं जीव आहे उरला । तो निघों पाहे ॥८॥