भजनी मालिका
← भजनांकडे परत

न विचारितां बळि घातला पाताळीं । सवेंचि कणव उपजली तये वेळीं

na vicharitan bali ghatala patalin | savenchi kanav upajali taye velin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
न विचारितां बळि घातला पाताळीं । सवेंचि कणव उपजली तये वेळीं । द्वार न संडिसि कवणेकाळीं । ऐसी तुझी करणी दातारा ॥१॥ अगा केशवा सुजाणा । गार्‍हाणें सांगू कवणा । तुझिये नामें तुटे बंधना । देवकीनंदना वासुदेवा ॥२॥ वसुदेव बांदवडी । आपदा करोन एवढी । मग त्या कंसा केवीं धाडी । मोक्ष तया दिधला ॥३॥ सुदामा सांगातें जेवी । धान्य मागे गांवोगांवीं । आपदा करोनि बहू ही । मग त्यासी राज्य दिधलें ॥४॥ जोहरीं सुदलें पांडवां । सवेंची उपजली कणवा । अग्निपासोनी केशवा । रक्षियेलें तयांसी ॥५॥ सभा पिसुनाची दाटली । द्रौपदी वस्त्रें आसुडली । एवढी आपदा करविली । मग वस्त्रें पुरविलीं तियेतें ॥६॥ दैत्यें गांजियला प्रल्हाद । तुझ्या नामाचा घेतला छंद । एवढा करुनियां खेद । मग त्या दैत्या वध केला ॥७॥ विभीषना हाणितल्या लाथा । लंका दिली त्या उचिता । समर्थें केलें तें बरवें आतां । तूं रघुनाथा ऐकें पैं ॥८॥ आम्ही लाडके डिंगर । माझें बोलणें उद्धट फार । तूं तंव कृपेचा सागर । उतरी पार म्हणे नामा ॥९॥