भजनी मालिका
← भजनांकडे परत

न सांपडे ऐसी कधीं । वेळ लागली ते संधी

na sampade aisi kadhin | vel lagali te sandhi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न सांपडे ऐसी कधीं । वेळ लागली ते संधी ॥१॥ हरिचे गुण वाचे यावे । श्रवणीं श्रवण ते करावे ॥२॥ गेलीं जातील वर्षे काळ । आयुष्या वेंचूनियां निर्फळ ॥३॥ निळा म्हणे यालागीं करा । वेगें आतां चित्तीं धरा ॥४॥