भजनी मालिका
← भजनांकडे परत

न साहे दुजेपण आपण आत्मखुण

na sahe dujepan apan atmakhun

न साहे दुजेपण आपण आत्मखुण । श्रुतीही संपूर्ण हारपती ॥१॥ वेदरूप श्रीकृष्ण योगिया जीवन । तें रूप परिपूर्ण आत्माराम ॥२॥ न दिसे वैकुंठीं योगियां ध्यानबीज । तो गोपाळांचें काज हरि करी ॥३॥ निवृत्ति गयनी हरि उच्चारित । माजि करि मनोरथ पुरी कामसिद्धि ॥४॥