भजनी मालिका
← भजनांकडे परत

न करितीचि कांही वाणी । देतां पुरविती आयणी

na karitichi kanhi vani | detan puraviti ayani

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न करितीचि कांही वाणी । देतां पुरविती आयणी ॥१॥ म्हणती घ्या रे घ्या निज मुखें । अवघ्यां एकचि धन सारिखें ॥२॥ नाहीं वांटितां भागले । सदा सर्वदा हरिखेले ॥३॥ निळा म्हणे पूर्णपणें । नेदिती पडों कोठें उणें ॥४॥