भजनी मालिका
← भजनांकडे परत

न कळती तुझिया मावा । दैत्यां देवां आणि मानवां

na kalati tujhiya mava | daityan devan ani manavan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न कळती तुझिया मावा । दैत्यां देवां आणि मानवां ॥१॥ कैसें तुझे रुप नाम । कोण कूळयाति धर्म ॥२॥ जागृत आहेसीं कीं निजलेला । उपवासीची कीं धाला ॥३॥ निळा म्हणे जित कीं मेला । न वजसी कोणी देखिला ॥४॥