भजनी मालिका
← भजनांकडे परत

न कळतां मुलांसंगें मी खेळत । गेलों सभेआंत राजयाच्या

na kalatan mulansangen mi khelat | gelon sabheant rajayachya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
न कळतां मुलांसंगें मी खेळत । गेलों सभेआंत राजयाच्या ॥१॥ काय सांगों माये जाहला अपमान । तेणें माझें मन । दुखावलें ॥२॥ मातें प्रेमभावें रायें आळवीलें । मांडी बैसवीलें सन्मानेशीं ॥३॥ आली आकस्मात्‌ दुर्धर कोपोन । लांस कीं ते कोण मी तो नेणें ॥४॥ ताडोनियां पायीं मज उठविलें । निघालों मी सहजें तत्‌क्षणीं ॥५॥ कोणी नुठवी ऐशाठायीं म्या बैसावें । तें कोणा मागावें सांग माये ॥६॥ नामा म्हणे दिसे पाहातां बाळक । ज्ञानची निष्टंक मुसावलें ॥७॥