भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुसावलें मुसें । प्रेम भक्तांचे वोरसे

musavalen musen | prem bhaktanche vorase

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मुसावलें मुसें । प्रेम भक्तांचे वोरसे ॥१॥ धरुनियां विठ्ठल रुप । विटे ठाकले विद्रूप ॥२॥ सांवळे सुंदर । कसूनियां पीतांबर ॥३॥ निळा म्हणे पदकें गळां । वैजयंती सुमनमाळा ॥४॥