भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुंगीस तो मार्गु सांपडे गोडीचा । योगीचा लक्षीचा ज्ञान ज्योती

mungis to margu sampade godicha | yogicha lakshicha dnyan jyoti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुंगीस तो मार्गु सांपडे गोडीचा । योगीचा लक्षीचा ज्ञान ज्योती ॥१॥ तरीच ओळखीजे केशवचरण । त्या जन्ममरण मग कैंचें ॥२॥ मत्स्य नानापरी क्रीडा खेळे जळीं । आनंदकल्लोळीं योगीराय ॥३॥ नामा म्हणे तोचि केशव जाणता । तया नाहीम व्यथा गर्भवासु ॥४॥