भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुलें सांगताती । माती खातो गे श्रीपती

mulen sangatati | mati khato ge shripati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुलें सांगताती । माती खातो गे श्रीपती ॥१॥ लांकूड घेऊनि हातांत । माती खातो कां पुसत ॥२॥ भावा भुललासे खरा । कांपतसे थरथरा ॥३॥ मुख दावीं उघडोनी । पाहें ह्मणे चक्रपाणी ॥४॥ ब्रह्मांडें देखिलीं । नामा ह्मणे वेडी झाली ॥५॥