भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूक्तत्वाची भ्रांती जे कांहीं धरिती

muktatvachi bhranti je kanhin dhariti

मूक्तत्वाची भ्रांती जे कांहीं धरिती । तेचि बद्ध होती निश्चयेंसी ॥१॥ कल्पना इवलुशी जये ठायीं असे । तिये ठायीं वसे अहंकार ॥२॥ देहीं ग्रासुनिया राहती जे सुखी । तेचि ते पारखी आत्मतत्त्वीं ॥३॥ सर्व ब्रह्मपूर्ण तयाशीच बोध । तयाशीच पद कैवल्याचें ॥४॥ साक्षीरूप पहा धरिती शरीर । तेचि ज्ञानेश्वर पूर्ण योगी ॥५॥