भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्ताईनें चांगा घेतलासे पोटा । उठा आतां भेटा लहान थोर

muktainen changa ghetalase pota | utha atan bheta lahan thor

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुक्ताईनें चांगा घेतलासे पोटा । उठा आतां भेटा लहान थोर ॥१॥ भेटले ऋषीश्वरा वैष्णव सकळीं । बैसले ते पाळी समाधीच्या ॥२॥ निवृत्ति मुक्ताईसी केला नमस्कार । उतरिले पार भवसिंधू ॥३॥ विठ्ठल रखुमाईसी केली प्रदक्षिणा । मग शुद्ध नमना आरंभिलें ॥४॥ नामा म्हणे देवा निवृत्ति मुक्ताई । चांगा लागे पायीं जाऊनियां ॥५॥