भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोहाचें मोहाळ सांगितले एकीं

mohachen mohal sangitale ekin

मोहाचें मोहाळ सांगितले एकीं । पाहतां परिपाकीं मोहाळ नाहीं ॥१॥ मोहिलेची दिसे मोहामाजी रसें । नसोनियां भासे तदात्मक ॥२॥ बिजीं बिज हरि दिसोनि अविट । विटोनीयां नीट कळिका फ़ाकें ॥३॥ बापरखुमादेविवरा आबोला सवळे । अवघेचि निवळे गुरुकृपा ॥४॥