भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तों समर्थाची दासी । मिठी घालीन पायांसीं

mi ton samarthachi dasi | mithi ghalin payansin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मी तों समर्थाची दासी । मिठी घालीन पायांसीं ॥१॥ हाचि माझा द्दढभाव । करीन नामाचा उत्सव ॥२॥ आम्हां दासीस हें काम । मुखीं विठ्ठल हरिनाम ॥३॥ सर्व सुख पायीं लोळे । जनीसंगें विठ्ठल बोले ॥४॥