भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तो तुझा दास न करी उदास । मायामोहपाश तोडीं देवा

mi to tujha das na kari udas | mayamohapash todin deva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मी तो तुझा दास न करी उदास । मायामोहपाश तोडीं देवा ॥१॥ प्राण जावो परी नको करूं त्याग । करी अंगसंग अंगिकार ॥२॥ अंगीकारी आतां अजामेळ अंतीं । समान श्रीपती सम करी ॥३॥ नामा म्हणे ऐसें वर्णावें म्यां किती । नामें केली ख्याति चराचरीं ॥४॥