भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी पणे सगळा वेदु हरपला

mi pane sagala vedu harapala

मी पणे सगळा वेदु हरपला । शास्त्रांचा खुंटला अनुवाद ॥ १ ॥ तें रूप सुंदर कृष्ण नाम सोपार । निरालंब गोचर गोकुळींचे ॥ २ ॥ सेविता योगियां सुलभ दुर्गम । गौळियां सुगम नाम घेतां ॥ ३ ॥ निवृत्ति निकट कृष्णनामसार । पापाचा संचार नाम छेदी ॥ ४ ॥