भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझें द्वैत अद्वैत होउनि ठेलें

mi majhen dvait advait houni thelen

मी माझें द्वैत अद्वैत होउनि ठेलें । सदगुरु एका बोलें ठेविलें ठायीं ॥१॥ द्वैत गिळी अद्वैत मेळीं । चित्ताची काजळी तोडी वेगीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति उदार । दीपीं दीप स्थिर केला सोयी ॥३॥