भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझें भावितां न फिटे हें ओझें । कर्मकण्ड दुजें आड येत

mi majhen bhavitan na phite hen ojhen | karmakanda dujen ad yet

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मी माझें भावितां न फिटे हें ओझें । कर्मकण्ड दुजें आड येत ॥१॥ न तुटे हें कर्म न चले हा धर्म । सर्वत्र हें ब्रह्म न कळे तया ॥२॥ मी माझें हें ओझें अहंताची वाहे । परतोनी न पाहे मी कवण ॥३॥ नामा म्हणे नाम स्मरे त्या कृष्णाचें । भय कळिकाळाचें नाहीं नाहीं ॥४॥