भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझे म्हणतां संसारीं गुंतलें

mi majhe mhanatan sansarin guntalen

मी माझे म्हणतां संसारीं गुंतलें । तंव परत्र परतेंचि राहिलें । हे ना म्हणउनि तया झोंबिन्नले तंव सिध्दासिध्द हातींचें गेलें ॥१॥ पुढीला चुकला मागिला मुकला तैसे परी जाली मातें । आपआपणातें गोंवीत बुध्दीं दोष ठेवी कवणातें रया ॥२॥ आतां एक बुध्दि आठवली गेलें तें परतेना मागुतें । बाप रखुमादेवीवराविठ्ठ्लु ध्याईजे तरी सकळिक होईल अपैतें ॥३॥