भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणोनियां तेथें उगाचि उभा । यावया जवळी पहननाभा । तोहि सर्वसाक्षी ओथंबा । जाणे हदगत केशियाचें

mhanoniyan tethen ugachi ubha | yavaya javali pahananabha | tohi sarvasakshi othamba | jane hadagat keshiyachen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणोनियां तेथें उगाचि उभा । यावया जवळी पहननाभा । तोहि सर्वसाक्षी ओथंबा । जाणे हदगत केशियाचें ॥१॥ मग चालत मंजुळ चाली । हळूहळूचि गेला जवळी । लगाम धरुनिया निज करतळी । हातें कुरवाळी मुखांतरी ॥२॥ मग रिकेबी देवोनि पावो । चढला वरी यादवरावो । हालों नंदितांचि नवलवो । घातला भार त्रिभुवनांचा ॥३॥ केशीया पाहे उडावया । तंव ओझें भारी नुचलवे पायां । म्हणे गेली व्यर्थचि माया । रचिलें येवढें लाघव तें ॥४॥ मग न चलवे ऐसें जाणेनि हरी । बारवा फोडिला चाबुकावरी । केशिया ह्रदयींचि रुदन करी । म्हणे घेतला प्राण निश्रचयेसी ॥५॥ हालों नेदीची हा गोंवळ । महाबलीया आमुचा काळ । कृष्ण म्हणे हें मुसळ । व्यर्थचि पोसिलें बेटियानें ॥६॥ चारुनियां दाणाचार । पुष्ट केला बहु थोर । नाही मिनला चाबुक स्वार । तोंचिवरी शोंभला ॥७॥ मग उतरला झडकरी । हातीं धरिली लगाम दोरी । तंव तो उपायीं येऊनियां वरी । हाणों धांवे टापेनें ॥८॥ मागे पेर वाळे झाडित । आडवाचि उडे मग कुकात । तोंड पसरुनियां विचकी दांत । डसावया श्रीहरी ॥९॥ येरु आतळोंचि नेदी त्या अंगा । धरिलें आंवरुनियां तुरंगा । घायांतळी आणूनियां चांगा । ताडिला मुष्ठीप्रहरें करुनि ॥१०॥ तेणेंचि तया आली तव । म्हणे कंसा वेगी धांव धांव । वेंचलों जीवेम करी कणव । सोडवीं मज याच्या हाती ॥११॥ तुझिया काजा वधावा हरी । म्हणोनियां आलों येथवरी । तव हा लाघविया मुरारी । बैसला जिव्हारी काय करुं ॥१२॥ पायीं बांधोनियां टाकिलें माझियाचि भूषणी मज गोंविलें । नाही अंतरी हें मज कळलें । कैसे करुं हदयासी ॥१३॥ ऐसी या विलापें आक्रंदतां । प्राण सोडिले तत्वतां । म्हणे मी फिरांनियां मागुता । न येचि येथें श्रीकृष्णा ॥१४॥ निळा म्हणे ऐकोनि श्रीकृष्ण । म्हणे वाग्देवी तुझी तुज प्रसन्न । जारे मुक्ति पदीं बैसोन । वस्ती करी तेथे सुखें ॥१५॥