भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणोनियां शब्द न पवेचि तत्वतां । बुध्दीचिया माथां वळघे कोण

mhanoniyan shabda na pavechi tatvatan | budhdichiya mathan valaghe kon

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणोनियां शब्द न पवेचि तत्वतां । बुध्दीचिया माथां वळघे कोण ॥१॥ मना पवना केंवि घडेल संचार । श्रुती परात्पर म्हणती ज्यातें ॥२॥ नाद बिंदु कळा ज्योती हीं बोलणीं । आरौतीं निर्वाणीं विरती तेथें ॥३॥ निळा म्हणे वर्म नेणती ते सकळें । वाचकें वाचाळे संतावीण ॥४॥