भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणे बा आतां करिशील कायी । एकाला ये ठायीं येऊनियां

mhane ba atan karishil kayi | ekala ye thayin yeuniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
म्हणे बा आतां करिशील कायी । एकाला ये ठायीं येऊनियां ॥१॥ वय हें केवढें बुद्धि हे केवढी । वांयां काढाकाढी तपाची कां ॥२॥ व्याघ्र आणि सिंह जंबुक विखार । नांदती या घोर वनामाजी ॥३॥ म्हैषा मसको भूतें वसती रानीं । तुज माये रानीं झोंबतील ॥४॥ नको बा या ठाईं राहूं चाल घराप्रती । जाऊं जोकां प्रीति तेचि देऊं ॥५॥ नामा म्हणे ध्रुव पाहेना बोलेना । आपुलिया ध्यानामाजीं मग्न ॥६॥