भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा

mhanavito nandacha bal yashodecha

म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा । आपण चौवाचातीत कृष्ण ॥ १ ॥ शब्दासि नातुडे बुद्धिसि सांकडें । तो सप्रेमें आतुडे स्मरतां नाम ॥ २ ॥ उपचाराच्या कोटी न पाहे परवडी । तों प्रेमळाची घोडी धोई अंगें ॥ ३ ॥ निवृत्तिचें तप फळलें अमुप । गयनिराजें दीप उजळिला ॥ ४ ॥