भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणतां वाचे वंदी तया यम । काळादिकांसम तुज एका

mhanatan vache vandi taya yam | kaladikansam tuj eka

रचनाकार: संत नामदेव · अभंग
म्हणतां वाचे वंदी तया यम । काळादिकांसम तुज एका ॥१॥ ऋद्धि सिद्धि दासी अंगण झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥ चारी वेद भाट होऊनि गर्जती । सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥ सुरवरांचे भार अंगणीं लोळती । चरणरज क्षितिं शिव वंदी ॥४॥ नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू । करी तो सांभाळू अनाथांचा ॥५॥