भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणसी कडवसां गे मायेचिया बैसा । मायाचि नाहीं मिथ्यापणें निजबोधप्रकाशा

mhanasi kadavasan ge mayechiya baisa | mayachi nahin mithyapanen nijabodhaprakasha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणसी कडवसां गे मायेचिया बैसा । मायाचि नाहीं मिथ्यापणें निजबोधप्रकाशा ॥१॥ लपों कोणीकडे गे सांग बाई निवाडें । अविदयाही म्हणसी तरी ते न दिसे निवाडे ॥२॥ कैंचें मी माझें हें गे झांकोळिलें तेजें । अवघी आत्मराजें माझया उजळीं निजें ॥३॥ निळा म्हणे नुरे गे लपणेंचि वोंसरे । याचिया प्रकाशें उजळले दरे खोरें ॥४॥