भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणसी बिभीषण शाहाणा । परि तो महा नूर्ख जाणा

mhanasi bibhishan shahana | pari to maha nurkha jana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
म्हणसी बिभीषण शाहाणा । परि तो महा नूर्ख जाणा ॥१॥ काय तो रामासी भेटला । अवघा रामचि नाहीं झाला ॥२॥ कोण हित केलें तेणें । राम नाकळीचि मनें ॥३॥ राम द्दष्टी देखतांची । पदवी न घेववे त्याची ॥४॥ म्हणशी झाला लंकापती । नाश पावेल कल्पांतीं ॥५॥ नामया स्वामीतें जिंकोन । आवघा रामचि मी होईन ॥६॥